logo

घाटात केमिकलने भरलेली महिंद्रा पिक अप पेटली


जीवित हानी नाही परंतु पर्यावरणाचे मोठे नुकसान

बुलढाणा, 3 एप्रिल थोड्या वेळापूर्वी खामगाव कडे जाणाऱ्या एका महिंद्रा पिकअप गाडीने बोथा घाटात पेट घेतला. सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास केमिकलने भरलेली ही महिंद्रा पिकअप गाडी देव्हारी फाट्याजवळ अचानक पेटायला सुरुवात झाली. ड्रायव्हरच्या हे लक्षात आल्यानंतर तो गाडीच्या बाहेर पळाला आणि त्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना थांबवले. पुढच्या काही क्षणातच महिंद्रा पिकअप गाडीतून आगीचे लोळ उठले. वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यामुळे जीवित हानी टळली परंतु बराच वेळ या गाडीमधून काळा धूर संपूर्ण घाटात पसरला होता. केमिकलने भरलेली ही गाडी जळून खाक झाली आहे.
एका प्रत्यक्ष द्रशिने संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे पाठविले आहे. आगे चा व्हिडिओ आपणास सारथी महा या YouTube channel बघायला मिळेल.

46
2895 views